Top
Home > Max Political > महायुतीचं सरकार स्थापन होईल - संजय निरुपम

महायुतीचं सरकार स्थापन होईल - संजय निरुपम

महायुतीचं सरकार स्थापन होईल - संजय निरुपम
X

राज्यात सरकार स्थापनेला विलंब होतोय, भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढी चालू आहे, सरकार कोणाचं स्थापन होईल याचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, शिवसेनेचे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेचाच होईल अशी वक्तव्य वारंवार केली आहेत.

काँग्रेसची शिवसेनेला पाठींबा देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतांना दिसतेय, या बद्दल संजय निरुपम मॅक्स 'महाराष्ट्राशी' बोलतांना म्हणाले की, जे माझ्या वाचण्यात आलं त्याला गृहीत धरून बोलायचं म्हंटल तर कॉंग्रेसनं शिवसेने बरोबर जायला नको, मागील अनेक वर्षांपासून भाजप सेनेमध्ये अशा प्रकारचे वाद सुरूच राहतात. त्यामुळे कितीही विलंब होऊ द्या शेवटी महायुती सत्ता स्थापन करेल. कारण राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना अस समीकरण बनेल परंतु शरद पवारांनी अगोदरच स्पष्ट शब्दात सांगितलंय की, आम्ही विरोधी पक्षात राहण पंसत करु, त्यामुळं हे समीकरण बनताना दिसत नाही, शेवट भाजप शिवसेनाच सत्ता स्थापन करेल अस मत संजय निरुपम यांनी व्यक्त केलयं.

Updated : 1 Nov 2019 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top