Home > News Update > कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा

कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या अनेक पोलिसांना याच करणामुळे जीव गमवावा लागला आहे. पण आता या पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा
X

कोविड -१९ मुळे मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल, असा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे.

"कोरोनाच्या युद्धात फ्रंटलाईनवर लढताना आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांनी त्यांच्या डोक्यावरील छताची चिंता करू नये,” असं गृहमंत्र्यांनी म्हटलेले आहे.

हे ही वाचा..

छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?

लोकल कधी सुरू होणार? रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय

नागपुरात बाबा रामदेव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल

कर्तव्यावर असताना ४ हजार २८८ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ हजार २३९ जण पूर्णतः बरे झाले आहेत. ५१ जणांचा बळी देखील गेला आहे, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिलेली आहे.

कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी राज्यातल्या पोलीसांवर मोठी जबाबदारी आहे आणि सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन नागरिकांनी करावं यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे.

Updated : 26 Jun 2020 4:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top