#missionbeginagain: आदरातिथ्य क्षेत्रासाठी नियमावली जाहीर

Courtesy: Social Media

सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत आता हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सोशल डिस्टन्सिंगसह नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसाठी नियमावली

१. प्रवेशद्वारावर हँड सॅनिटायझर, ताप तपासण्याची सोय असणे बंधनकारक

२. कोणतीही लक्षणे नसलेल्या कर्मचारी आणि ग्राहकांनाच फक्त आत परवानगी

३. कर्मचारी आणि ग्राहकांनी तोंडावर मास्क लावला असेल तरच परवानगी. हॉटेलमध्येही सर्वांना मास्क बंधनकारक

४. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक

५. सर्व कर्मचारी हँडग्लोव्हज घालूनच ग्राहकांना सेवा देणार

६. संसर्गाचा धोका असलेले वयस्कर, गर्भवती किंवा आजाराची पार्श्वभूमी असलेले कर्मचारीअसल्यास विशेष काळजी घ्यावी

७. हॉटेलमध्ये सामूहिक कार्यक्रमांना बंदी कायम

८. पार्किंगच्या ठिकाणीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम बंधनकारक

९. ग्राहक, कर्मचारी किंवा मालवाहतूक करणारे कर्मचारी यांच्या प्रवेशाची वेगळी सोय

१०. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची प्रवासाची पार्श्वभूमी, वैद्यकीय पार्श्वभूमी, ओळखपत्र याची माहिती रिसेप्शनवर भरून घ्यावी.