Home > News Update > एअर इंडिया, भारत पेट्रोलिअम विक्रीला

एअर इंडिया, भारत पेट्रोलिअम विक्रीला

एअर इंडिया, भारत पेट्रोलिअम विक्रीला
X

सरकारी मालकीच्या कंपन्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम पुढच्या येत्या चार महिन्यात विकल्या जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

या दोन्ही कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. त्यामुळे कंपन्या विकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सीतारमण यांनी सांगतिलं आहे. सरकारवर सध्या ५८ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीमधून सुमारे एक लाख कोटी रुपयांचा फायदा होईल, अशी आशा सितारामन यांनी व्यक्त केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

Air India, Bharat Petroleum Corporation to be sold by March: FM Nirmala Sitharaman - Times of India https://t.co/8FbWsiSdSH

या वर्षाअखेरपर्यंत या दोन्ही कंपन्या विकण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून मार्च २०२० पर्यंत कंपन्या विकण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्यावर्षी सरकारने एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विक्रीसाठी काढला होता. मात्र, त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. सरकारकडे एअर इंडियाचे १०० टक्के समभाग आहेत.

दुसरीकडे भारत पेट्रोलिअम (BPCL) चं बाजार भांडवल सुमारे १.०२ लाख कोटी रुपये आहे. त्यातले ५३ टक्के शेअर्स विकून ६५,००० कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचं करण्याचं सरकारचं नियोजन आहे.

Updated : 17 Nov 2019 10:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top