जगातील कोरोनाबाधीत देशांच्या यादीत भारत 11व्या स्थानी, चीनला टाकलं मागे

Courtesy: Social Media

संपूर्ण जगभरातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या आता 45 लाख 42 हजार 347 झालली आहे. तर एकूण मृतांची संख्या 3 लाख 7 हजार 666 झाली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक आता 11 आहे. ज्या चीनमधून कोरोनाच्या प्रसाराची सुरूवात झाली त्या चीनचा 13 नंबर आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारताने आता चीनलाही टाकले मागे.

दिलासादायक बाब म्हणजे जगातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 16 लाख 37 हजार 67 झाली आहे. जगभरात सर्वाधिक रुग्णसंख्या अमेरिकेत असून ती आता 14 लाख 42 हजार 824 वर जाऊन पोहोचली आहे. तर अमेरिकीतील मृतांची संख्या 87 हजार 530 झाली आहे. अमेरिकेनंतर जगातील सर्वाधिक रुग्ण रशियामध्ये ही संख्या 2 लाख 62 हजार आहे. तर त्यानंतर ब्रिटन 2 लाख 38 हजार आहे.