जगभरातील कोरोना बळींची संख्या २ लाख ४० हजारांच्याजवळ

Courtesy: Social Media

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग ठप्प झालेले असताना आता जगातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३४ लाख ४२ हजार २३४ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार गेल्या २४ तासात कोरोनाचे ८४ हजार ३ नवे रुग्ण आढळले आहेत.

हे ही वाचा


काय आहे सुरक्षा कवच अँड्रॉइड ऍप (Suraksha Kavach) Application ?

राज्यांच्या राजकारणात पडू नका: शरद पवारांचं मोदींना पत्र

Coronavirus: दिलासादायक राज्यात 2,465 रुग्ण कोरोनामुक्त, रुग्णांची संख्या 14, 541 वर

तर मृतांची संख्या २ लाख ३९ हजार ७४० वर पोहोचली आहे. दरम्यान वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत कोरोनाचे ११ लाख ७५ रुग्ण झाले आहेत तर यापैकी ६८ हजार १६६ रुग्णांची मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनावरील लस या वर्षांच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल अशी आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.