जगभरातील कोरोनाबाधीतांची संख्या 40 लाखांच्यावर

Courtesy: Social Media

जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनामुळे बाधीत झालेल्या रुग्णांची जगभरातील संख्या आता 40 लाख 20 हजार 878 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 2 लाख 79 हजारांवर पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ज़ॉन हॉपकीन विद्यापीठानं दिलेल्या माहितीनुसार आता कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 13 लाख 69 हजार 557 वर पोहोचली आहे.

हे ही वाचा…


…अखेर शरद पवारांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन

ठाकरे सरकारचं प्रशासन कुचकामी ? माजी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

पडळकर इन, जानकर आऊट?

वाघांनो असं रडताय काय? पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना ट्विट…

तर जगभरातील सर्वाधिक रुग्णसंख्या अमेरिकेत आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 13 लाख ९ हजार 164 झाली आहे. तर आतापर्यंत ७८ हजार ४०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक रुग्ण हे स्पेन. इटली, ब्रिटनमध्ये आढळले आहेत.