Home > News Update > #कोरोनाचा_कहर - 24 तासात जगभरात 1 लाख 89 हजार रुग्ण

#कोरोनाचा_कहर - 24 तासात जगभरात 1 लाख 89 हजार रुग्ण

#कोरोनाचा_कहर - 24 तासात जगभरात 1 लाख 89 हजार रुग्ण
X

संपूर्ण जगात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढतच आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात जगात कोरोनाचे सुमारे 1 लाख 89 हजार 77 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

तर जगभरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता 1 कोटींच्या जवळ पोहोचली आहे, सध्या ही संख्या 98 लाख 43 हजार एवढी आहे. तर कोरोना बळींची संख्याही आता 5 लाखांच्या जवळ जाऊन पोहोचली आहे.

अनेक देशांमध्ये 24 तासात रुग्ण सापडण्याचा उच्चांक नोंदवला गेला आहे. अमेरिकेत लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.

हे ही वाचा..

#कोरोनाचा_कहर – 24 तासात जगभरात 1 लाख 89 हजार रुग्ण

#कोरोनाशी_लढा – लोकल फेऱ्या वाढणार

कोरोनाच्या लक्षणांची चाचणी तुम्हीही करु शकता का?

गेल्या 24 तासात अमेरिकेत 46 हजार 860 तर ब्राझीलमध्ये 44 हजार 558 नवीन रुग्ण आढळलेले आहेत. तर गेल्या 24 तासात 4 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी नोंदवण्यात आलेल्या मृत्यूंच्या संख्येमध्ये एका दिवसात सुमारे दोन हजारांनी घट झाली आहे. दरम्यान जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 कोटींच्यावर पोहोचली आहे.

Updated : 29 Jun 2020 1:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top