#कोरोनाशी लढा- जागतिक कोरोना बळींची संख्या ४ लाखांच्या वर

covid -19 world pandemic

संपूर्ण जगभरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता ७० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. वर्ल्डोमीटर या संस्थेच्या माहितीनुसार सध्या जगात कोरोनाचे ६९ लाख ९० हजार ९७० रुग्ण आहेत. तर एकूण कोरोना बळींची संख्या ४ लाख १ हजार ९७८ झाली आहे.

पण दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल ३४ लाख ११ हजार ७४ आहे. त्यामुळे कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या ३१ लाख ५७ हजार ८८५ एवढी आहे. यापैकी फक्त २ टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर ९८ टक्के रुग्णांना सौम्य त्रास होतो आहे. दरम्यान अमेरिकेतील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा १ लाख १२ हजारांच्या पुढे गेला आहे. त्यानंतर सर्वाधिक रुग्ण हे ब्राझीलमध्ये असून ही संख्या आता ७ लाखांच्या जवळ पोहोचली आहे.

world corona meter