कोरोनाबाधीत रुग्णांची जागतिक संख्या 50 लाखांच्या उंबरठ्यावर

Courtesy: Social Media

संपूर्ण जग ठप्प करणाऱ्या कोरोना विषाणूमुळे बाधीत झालेल्या रुग्णांची जागतिक संख्या आता 50 लाखांच्या अगदी जवळ पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार आता जगातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 49 लाख 92 हजार 487 झाली आहे.

तर मृतांची संख्या 3 लाख 27 हजार 642 झाली आहे. एकूण रुग्णांपैकी जगात आतापर्यंत 18 लाख 95 हजार 834 रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. तर अमेरिकेत एकूण रुग्णांची संख्या 15 लाख 50 हजारांच्यावर पोहोचली आहे. अमेरिकेतील मृतांची संख्या आता 93 हजारांच्यावर गेली आहे.

हे ही वाचा…


Exclusive: पंकजा मुंडे यांना पक्षाने उमेदवारी का नाकारली? पहा काय म्हणाले सुरेश धस

घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत: अजित पवार भाजपवर संतापले 

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का !

अमेरिकेत एकूण रुग्णांपैकी 2 लाख 94 हजार 312 रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेनंतर जगात सर्वाधिक रुग्ण हे रशियामध्ये असून इथली रुग्णसंख्या 3 लाखांपर्यंत गेली आहे. पण रशियातील रुग्णसंख्येच्या तुलनेत मृतांची संख्या कमी आहे, इथे आतापर्यंत 2 हजार 972 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.