८ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असणारा विकास दुबे गजाआड

Gangster vikas dubey main accused in kanpur police encounter case arrested

उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला गुंड विकास दुबे याला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन मधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

२ जुलै रोजी विकास दुबे याला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक कानपूर मधील एका गावात गेलं होतं यावेळी या पथकावर विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता या गोळीबारात आठ पोलिस शहीद झाले होते त्यानंतर विकास दुबे हा फरार झाला होता उज्जैन इथल्या महाकाल मंदिरात आला होता.

त्यानंतर मंदिराच्या आवारात उभा राहून मीच कानपुरचा विकास दुबे आहे असं तो रडू लागला आणि त्यानंतर तिथल्या सुरक्षारक्षकांनी आणि परिसरातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी विकास दुबेला ताब्यात घेतलेले आहे.

दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी आतापर्यंत विकास दुबेच्या 3 गुंडांना एन्काऊंटर मध्ये ठार केलेले आहे. बाहुआ दुबे आणि प्रभात मिश्रा या दोन गुंडांना पोलिसांनी गुरुवारी सकाळी चकमकीत ठार केले आहे. तर बुधवारी अमर दुबे यालादेखील पोलिसांनी ठार केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here