देशातील ८० कोटीहून अधिक नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशन: मोदी

देशातील ८० कोटीहून अधिक नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशन: मोदी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी वेळीच लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशातील परिस्थिती स्थिर राहिल्याचा दावा केला. मात्र, अनलॉकमध्येही वैयक्तिक व सामाजिक परिस्थितीतकडे लोक दुर्लक्ष करत असल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

लॉकडाऊन दरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात आले होते. मात्र आता देशातील नागरिक, संस्था पुन्हा तशाच स्वरुपातील सतर्कता दाखविण्याची गरज असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंटेन्टमेंट झोनमध्ये अधिक काळजी घेण्याच्या सूचना देशातील नागरिकांना केल्या आहेत.

‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची’ मुदत वाढवली

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची’ मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवल असल्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना प्रतिव्यक्ती 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि 1 किलो चणे मोफत दिले जाणार आहेत.

पंतप्रधान गरीब अन्न कल्याण योजनेच्या विस्तारासाठी 90 हजार कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात येणार आहे. यापूर्वीचे तीन महिने आणखी जोडले तर एकूण लाख कोटी रुपये खर्च यासाठी होणार आहे. देशातील 80 कोटी जनतेला याचा लाभ होईल असा दावा पंतप्रधानांनी केला आहे.

यावेळी मोदी यांनी देशासाठी एक राष्ट्र, एक रेशनकार्ड व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. याचं श्रेय शेतकऱ्यांना जातं. असं म्हणत त्यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले. तसंच देशातील करदात्यांचं देखील त्यांनी आभार मानले.
मोदींनी यावेळी मास्क, गमछा, फेसकव्हर यांचा उपयोग करा, याची आठवण मोदींनी करून दिली. बेपर्वाई करू नका, हलगर्जीपणा करू नका. असं मोदी यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here