Home > News Update > #कोरोनाशी लढा : असंघटित कामगारांसाठी विशेष सायकल

#कोरोनाशी लढा : असंघटित कामगारांसाठी विशेष सायकल

#कोरोनाशी लढा : असंघटित कामगारांसाठी विशेष सायकल
X

कोरोनाच्या (corona) संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा (lockdown) फटका सगळ्यात जास्त बसला तो कामगार आणि मजूर वर्गाला.... हातचे काम गेल्याने जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. सध्या कामगारांना कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाहीये. दुचाकी परवडत नाही अशा स्थितीत कष्टका-यांना दिलासा म्हणून विविध संस्थातर्फे पिंपरी चिंचवडममध्ये (Pimpri chinchvad) महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर (Shravan Hardikar) यांच्या हस्ते विशेष सायकलचे वाटप करण्यात आले.

यावेळी स्वच्छता कामगार ,फेरीवाला, घरेलू कामगार कंत्राटी कामगार, बांधकाम कामगार यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात १५ सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले असून यासाठी २०० कामगारांनी नोंदणी केली आहे.

हे ही वाचा...


अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाही, मुख्यमंत्री आणि राज्यपाल आमने सामने

महाराष्ट्र कोरोनावरील लस विकसित करणार, 30 माकडांवर प्रयोग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन, 'हे' आहे कारण...

'निसर्ग' संकट : वादळाचा वेग वाढला, सतर्क राहा!

सायकल टू वर्क, पुणे सायकलवेरनेस, निसर्ग सायकल मित्र, भद्रायराजते प्रतिष्ठान, ग्रीन सायकल क्लब, युलू बाईक्स आणि कष्टकरी संघर्ष महासंघ यांच्यातर्फे प्रायोगिक तत्वावर कष्टकरी तसेच कोव्हीड योद्ध्यांना सायकल वाटप करण्यात आले. आता इतर जिल्ह्यातही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Updated : 3 Jun 2020 2:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top