कोरोना अपडेट | औरंगाबाद एक हजार पार; आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू

Courtesy: Social Media

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज औरंगाबादने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा एक हजारांचा टप्पा ओलांडला. आज सकाळी ५९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ हजार २१ झाली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येसोबत मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढत आहे. काल संध्याकाळी कोरोनाचा ३२ वा मृत्यू झाला. शहरातील मदनी चौक येथे राहणारे ६५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाने घाटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

एक हजारांवर रुग्णांना कोरोनाचा झालेला संसर्ग अत्यंत चिंताजनक बाब आहे. शहरात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी रुग्णांची संख्या थांबत नाहीय.