दिल्ली विश्वविद्यालय ते देशाचे अर्थमंत्री… जाणून घ्या अरुण जेटली यांचा जीवनप्रवास

8
देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं दीर्घ आजारानं दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झालं आहे. ते दिल्लीच्या एम्स रुग्णालयात 9 ऑगस्ट पासून ते उपचार घेत होते. त्यांनी दिल्ली एम्स रुग्णालयात वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

भाजपसह विरोधी पक्षांतील नेत्यांनी जेटली यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे.
जेटली यांची राजकीय पारी…

1974 : दिल्ली विश्वविद्यालयमध्ये छात्र संघाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त
1977 : जनसंघामध्ये प्रवेश
1977 : एबीवीपीच्या अखिल भारतीय सचिव पदी नियुक्ती
1980 : भाजप च्या युवा मोर्चा चे अध्यक्ष पदी निवड
1991 : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी चे सदस्य
1999 : भाजप प्रवक्ते पदी नियुक्ती
1999 : वाजपेयी सरकारमध्ये सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) पद सांभाळले
2000 : राम जेठमलानीच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे कायदा, न्याय, जहाज बांधणी आणि कंपनी मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सोपवला
2002 : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती
2009 : राज्यसभेत विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती
2014 : लोकसभा निवडणुकीत पराभव
2014 : मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, सूचना आणि प्रसारण मंत्रालयपदी नियुक्ती
Comments