दिलासादायक: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना AIIMS रुग्णालयातून डिस्चार्ज…

former-prime-minister-manmohan-singh-has-been-discharged-from-aiims

देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला आहे. दोन दिवसापुर्वी त्यांच्या छातीत वेदना होत असल्यानं त्यांना AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दोन दिवसांपासून कार्डियक न्यूरो सेंटरमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.