गरिबांच्या मदतीसाठी हवेत ६५ हजार कोटी: रघुराम राजन

कोरोना व्हायरस मुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचं चाक गाळ रुतण्याची चिन्हं आहेत. अगोदरच मंदीच्या संकटातून जाणाऱ्या भारताला कोरोना चा मोठा फटका बसणार आहे. अशा परिस्थिती याची सर्वाधिक झळ या देशातील गरिबांना बसणार आहे. कोरोना व्हायरसमुळं या देशातील अनेक लोकांचं पोट Lockdown झालं आहे.

हे ही वाचा

विरोधी पक्ष आणि रडीचा डाव

 

मेंढरांची लोकशाही आणि UAPA ची नवजातक कथा

 

मोदी उद्धव ठाकरेंचं ऐकणार का?

त्यामुळं गरिबांना मदतीची तात्काळ गरज असल्याचं मत माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. यासाठी सरकारला 65 हजार कोटींची गरज असल्याचं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दूरचित्रसंवादाद्वारे त्यांच्याशी संवाद साधला यावेळी राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी या देशातील गरिबांना मदतीसाठी 65 हजार कोटींची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.