Home > News Update > कोरोनाच्या लसीची मानवी चाचणी सुरू, दिल्लीत एका व्यक्तीला पहिला डोस

कोरोनाच्या लसीची मानवी चाचणी सुरू, दिल्लीत एका व्यक्तीला पहिला डोस

कोरोनाच्या लसीची मानवी चाचणी सुरू, दिल्लीत एका व्यक्तीला पहिला डोस
X

कोरोनाविरुद्धची लढाई आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. संपूर्ण जग ज्या लसीची वाट पाहत आहे. त्यातील भारतात बनवण्यात आलेल्या लसीच्या मानवी चाचणीला दिल्लीत सुरूवात झाली आहे. दिल्लीत एका 30 वर्षांच्या तरुणाला Covaxin लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या लसीच्या संशोधनात सहभागी असलेल्या डॉ. संजय राय यांनी या मानवी चाचणीची माहिती दिली आहे.

दिल्लीत राहणाऱ्या या तरुणआची दोन दिवस आधी वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्याची प्रकृती व्यवस्थित होती तसंच त्याला इतर कोणतेही आजार नाहीयेत. लसीचा पहिला डोस देण्यात आल्यानंतर 2 तास या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यात त्याला कोणताही त्रास जाणवला नाही. तसेच पुढचा आठवडाभर त्याचे निरीक्ष केले जाणार आहे. आतापर्यंत सुमारे 3500 लोकांनी एम्समध्ये लसीच्या चाचणीसाठी नोंदणी केली आहे.

हे ही वाचा...

राज्यातील लॉकडाऊन कधीपर्यंत? मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका

कोरोनावरील उपचारांसाठीच्या औषधांचा काळाबाजार, एक इंजेक्शन 60 हजारांना

राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 2 लाखांच्या जवळ

22 जणांवर या लसीचा प्रयोग सुरू असून त्यांच्या प्रकृती रिपोर्ट आल्यानंतर 1 ते 2 दिवसात इतरांवरही या लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे. रुग्णांना एक आरोग्य कार्ड देण्यात आले असून त्यांनी आपल्या प्रकृतीची माहिती दररोज त्यात लिहायची आहे. लस दिल्यानंतर डॉक्टर आठवडाभर त्यांच्याकडून फोनवरुन प्रकृतीची माहिती घेत राहणार आहेत, अशी माहितीही राय यांनी दिली आहे.

देशात आणखी बारा ठिकाणी या लसीची चाचणी सुरू असल्याची माहिती ICMRने दिली आहे. भारत बायोटेक, आयसीएमआर आणि पुण्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांनी मिळून ही लस तयार केली आहे.

Updated : 25 July 2020 2:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top