Home > News Update > राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली ५ उमेदवारांची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली ५ उमेदवारांची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली ५ उमेदवारांची घोषणा
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेसाठी पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील ५ उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले शरद पवार आज बीड जिल्ह्यात आहेत. यावेळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.

जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे परळी मतदारसंघात धनंजय मुंडे, गेवराईतून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगाव- प्रकाश सोळंके असे राष्ट्रवादीचे पहिले उमेदवार शरद पवारांनी आज घोषित केले आहेत. तर आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असे शरद पवारांनी सांगितले.

यामुळे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा काका-पुतण्याचं राजकारण पाहायला मिळणार आहे. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी लढत होणार आहे तर आणि परळीमध्ये गेल्यावेळेसप्रमाणे पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत रंगणार आहे.

Updated : 18 Sep 2019 9:15 AM GMT
Next Story
Share it
Top