Home > News Update > नवी मुंबईत मोठी दुर्घटना टळली...

नवी मुंबईत मोठी दुर्घटना टळली...

नवी मुंबईत मोठी दुर्घटना टळली...
X

नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गावर असलेल्या 21 मजली टॉवरला आग लागली होती. सीवूड मधील 'सी होम्स' या टॉवरच्या 20 व्या मजल्यावर प्रथम आग लागली. काही वेळात या आगीने भीषण रूप धारण करत 21 व्या मजल्यापर्यंत पसरली. सकाळी सहा च्या सुमारास ही आग लागली होती. आग लागताचं इमारत खाली केली गेली. दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या दरम्यान कुलिंगचे काम सुरू असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात अग्नीशमन दलाचे ७ जवान जखमी झाले. पालिकेच्या रुग्णालयात या जवानांवर उपचार सुरु आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Updated : 8 Feb 2020 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top