Home > News Update > Economic Survey- 5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न कठीण

Economic Survey- 5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न कठीण

Economic Survey- 5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न कठीण
X

देशाचा आर्थिक विकासदर पुढील आर्थिक ६ ते ६.५ टक्के राहिल असा अंदाज आज सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात नोंदवण्यात आला आहे. मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन (Dr. Krishnamurti Subramanyan) यांनी तयार केलेला अहवाल आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. चालू आर्थिक वर्षात वित्तीय वाढीसाठी तुटीचं उद्दीष्ट कमी ठेवावं लागणार असल्याचं सुब्रमण्यन यांनी सांगितले आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतींवर उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आल्याचं निरीक्षणही या अहवालात नोंदवण्यात आलं आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/257084291929356/

आर्थिक सर्वेक्षण अहवालातील मोठे मुद्दे

  • चालू आर्थिक वर्षात विकासदर ५ टक्के एवढा राहण्याची शक्यता
  • २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६ ते ६.५ टक्के राहण्याची शक्यता
  • चालू आर्थिक वर्षात करवसुलीमध्ये घट होण्याची शक्यता
  • महागाई दर एप्रिल २०१९ मध्ये ३.२ टक्के होता तो डिसेंबर २०१९ मध्ये २.६ टक्के झाला. पण अर्थव्यस्थेत मागणी घटल्याचं चित्र आहे.
  • जीएसटी करातून उत्पन्न वाढीची शक्यता असली तरी त्याबबात अजून स्पष्टता नाही मागणी वाढवण्यासाठी सरकारला उपाययोजना कराव्या लागणार
  • आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी काही नियम शिथिल करावे लागतील
  • जागतिक मंदीचा परिणाम भारताच्या अर्थव्यस्थेवर
  • अनेक क्षेत्रात मंदी आल्यामुळे गुंतवणूक कमी झाल्यानं विकासदरावर परिणाम
  • अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उत्पादन क्षेत्रावर जास्त भर द्यावा लागणार उत्पादन क्षेत्रात तेजी आल्यास रोजगाराच्या संधी वाढणार
  • कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांचा प्रभाव नाही
  • निर्यातीला चालना देण्यासाठी बंदरांवरील सरकारी लालफीतशाही कमी करावी लागणार
  • उद्योग सुरु करण्यासाठी मालमत्ता कर, कर भरणे, करार पध्दतीसारखे नियम अधिक सुटसुटीत करण्याची आवश्यकता
  • सरकारी बँकांच्या कामकाजात सुधारणा आणि अधिक पारदर्शकता आणण्यासाठी बँकांसंदर्भातील माहिती सार्वजनिक करण्याची गरज

Updated : 31 Jan 2020 8:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top