Home > News Update > रेकॉर्डब्रेक भाषण करणाऱ्या अर्थमंत्री

रेकॉर्डब्रेक भाषण करणाऱ्या अर्थमंत्री

रेकॉर्डब्रेक भाषण करणाऱ्या अर्थमंत्री
X

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत त्यांचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दूसऱ्या महिला अर्थमंत्री ठरल्यात. मात्र दुसरा विक्रम त्यांनी आज केलाय. तो म्हणजे सीतारमण यांनी आतापर्यंतचं सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा.

निर्मला सीतारमण यांनी २ तास ४१ मिनिटे भाषण केलं. देशात आतापर्यंत सादर झालेल्या ९१ अर्थसंकल्पीय भाषणामधील हे सर्वाधिक लांब भाषण होतं. अडीच तासापेक्षा जास्त वेळ भाषण दिल्यानंतरही त्यांना पुर्ण भाषण वाचता आलं नाही. तब्बेत बिघडल्यामुळे दोन पान त्या वाचू शकल्या नाही.

यापुर्वी सर्वात जास्त वेळ भाषण देण्याचा विक्रम जसवंत सिंह यांच्या नावावर होता. २००३ मध्ये जसवंत सिंह यांनी २ तास १३ मिनिटाचं अर्थसंकल्पीय भाषण केलं होत.

सर्वात जास्त भाषण करणारे अर्थमंत्री

वर्ष २०२०- निर्मला सीतारमण- २ तास ४१ मिनिट

वर्ष २००३- जसवंत सिंह- २ तास १३ मिनिट

वर्ष २०१४- अरुण जेटली- २ तास १० मिनिट

वर्ष २०१९- निर्मला सीतारमण- २ तास ०५ मिनिट

अर्थसंकल्पात जास्त शब्द वापरण्याचा रेकॉर्ड मनमोहन सिंग यांच्या नावावर आहे. १९९१ मध्ये अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करतांना मनमोहन सिंग यांनी १८ हजार ६५० शब्द वापरले होते. त्यानंतर अरुण जेटली यांनी १८ हजार ६०४ शब्द वापरुन दुसरा क्रमांक पटकावला. तर त्यानंतर तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांकावर शब्द वापरण्याचा विक्रम अरुण जेटली यांच्या नावावर आहे.

सर्वाधिक शब्द वापरणारे अर्थमंत्री

वर्ष १९९१- मनमोहन सिंग- १८ हजार ६५० शब्द

वर्ष २०१७- अरुण जेटली – १८ हजार ६०४ शब्द

वर्ष २०१५- अरुण जेटली- १८ हजार १२२ शब्द

वर्ष २०१८- अरुण जेटली- १७ हजार ९९१ शब्द

सर्वात कमी शब्द वापरणारे अर्थमंत्री

वर्ष- १९७७- हिरुभाई पटेल- ८०० शब्द

सर्वात जास्त अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री

मोरारजी देसाई- १० वेळा

पी चिदंबरम- ९ वेळा

१९७७ मध्ये अंतरीम अर्थसंकल्प मांडताना तत्कालीन अर्थमंत्री हिरुभाई पटेल यांनी ८०० शब्द वापरले होते. आतापर्यंत मोरारजी देसाई यांनी १० वेळा अर्थसंकल्प सादर केले तर पी चिदंबरम यांनी एकुण नऊवेळा अर्थसंकल्प मांडलात. १९७० मध्ये अर्थसंकल्प मांडणारी पहिली महिला म्हणून इंदिरा गांधी यांना बहुमान मिळाला. पंतप्रधानपदासोबत त्यांच्याकडे अर्थखातही होत.

Updated : 1 Feb 2020 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top