Home > News Update > राज्याचा महसूल वाढवण्यासाठी अजित पवारांची नवीन योजना

राज्याचा महसूल वाढवण्यासाठी अजित पवारांची नवीन योजना

राज्याचा महसूल वाढवण्यासाठी अजित पवारांची नवीन योजना
X

मद्यनिर्माता ते मद्यविक्री दुकानांची जोडणी संगणकीकृत यंत्रणेच्या माध्यमातून करुन उत्पादन शुल्क विभागाने करचोरीला आळा घालावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

राज्याच्या महसूलवाढीबाबत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची आढावा बैठक अजित पवार यांनी घेतली होती. यामध्ये हे निर्देश देण्यात आले आहेत.

अवैध मद्यविक्री, हातभट्टी निर्मितीमुळे राज्याच्या महसुलात होणारी तूट टाळण्यासाठी पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त छापे टाकावेत. अवैध मद्यनिर्मितीच्या अनुषंगाने दाखल तक्रारीत शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. साखर कारखान्यांच्या डिस्टीलरी प्रकल्पातून स्पिरिट चोरीला आळा घालावा. इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करुन महसूलवाढीसाठी उपाययोजना कराव्यात.

हे ही वाचा...

गौरी लंकेश हत्येचा मुख्य आरोपी अटकेत

मॅक्स महाराष्ट्राच्या सायबर हल्ल्याची चौकशी सुरु – गृहमंत्री

आता कोणत्याही गडावरून कसलंच राजकारण नाही – धनंजय मुंडे

अशा सूचना अजित पवार यांनी या बैठकीत दिल्या आहेत.

वाईन शॉपमधून सिलबंद मद्याच्या विक्रीत कमाल किरकोळ किंमतीचे (एमआरपी) सर्रास उल्लंघन होते. त्याबाबतही विभागाने नियमित कारवाई करावी. प्रलंबित अपिले जलदगतीने निकालात काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी. लेबल मंजूरी, करगळती रोखण्यासाठी अन्य राज्यातील संगणकीकृत प्रणालींचा अभ्यास करुन तशा प्रकारची यंत्रणा निर्माण करावी. असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

या बैठकीत नायर-सिंह आणि लवंगारे-वर्मा यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विभागाची माहिती सादर केली. यावेळी वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, सचिव राजीव मित्तल, उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह हे अधिकारी उपस्थित होते.

Updated : 10 Jan 2020 4:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top