Home > News Update > पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
X

भारत सरकार ने Unlock 1 ची घोषणा केल्यानंतर आता राज्यसरकारने देखील नियम शिथील करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

कसा तयार होणार निकाल?

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विद्यापिठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सेमिस्टरची सरासरी काढून विद्यार्थ्यांना पास करण्यात येणार आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी अजून गुण मिळवू शकतो, परीक्षा द्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी साधारण ऑक्टोबरच्या सुमारास परीक्षा घेण्याची तयारी ठेवत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Updated : 31 May 2020 4:09 PM GMT
Next Story
Share it
Top