Home > News Update > मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांच्यावर खोटा गुन्हा, पोलिसांच्या लबाडीचा पर्दाफाश

मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांच्यावर खोटा गुन्हा, पोलिसांच्या लबाडीचा पर्दाफाश

सरकारी कामातील भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर पोलीस कसे खोटे गुन्हे दाखल करतात याचा पर्दाफाश झाला आहे. मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे सिद्ध झाले आहे.

मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांच्यावर खोटा गुन्हा, पोलिसांच्या लबाडीचा पर्दाफाश
X

सरकारी कामातील भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर पोलीस संबंधित यंत्रणेच्या मदतीने कसे खोटे गुन्हे दाखल करतात याचा पर्दाफाश झाला आहे. मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करुन घेतल्याचे एका सरकारी कागदपत्रावरुनच सिद्ध झाले आहे.

मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांना सांगली जिल्ह्यातील कमळापूर गावात ठेकेदाराने धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. गावातील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून त्यात गैरप्रकार झाल्याची तक्रार सागर गोतपागर यांनी केली होती. तसंच यासंदर्भातली बातमी ते कव्हर करण्यासाठी गेले होते. पण यावेळी त्यांना ठेकेदार आणि त्याच्या मित्रांनी धक्काबुक्की करत शिविगाळ केली. त्यानंतर सागर गोतपागर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

यानंतर कमळापूर गावातील रस्त्याच्या कामावरील सुपरवायझर लक्ष्मण साळुंके यांनी पोलिसांत सागर गोतपागर यांनी खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीत सागर गोतपागर यांना 15 जुलै रोजी दुपारी 1 वाजता आपण कमळापूर गावात 10 हजार रुपये खंडणी दिली असा आरोप केला आहे. पण हा आरोप धादांत खोटा आहे आणि पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता गुन्हा दाखल करुन घेतल्याचे सिद्ध झाले आहे.

सागर गोतपागर यांच्या निर्दोषत्वाचा आणि पोलिसांच्या लबाडीचा पर्दाफाश करणारा सरकारी पुरावाच समोर आला आहे. 15 जुलै रोजी सागर गोतपागर यांनी कमळापूर गावात खंडणी स्वीकारली असा आरोप ठेकेदाराने केला आहे. पण त्याच दिवशी सागर गोतपागर आणि त्यांचे इतर सहकारी विटा शहरामध्ये 9 जुलैपासून धरणे आंदोलन करत होते आणि त्यांनी 15 जुलैपासून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली, असे पत्रच विटा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनी दिले आहे. तसंच त्यांची वैद्यकीय तपासणीही त्या दिवशी करण्यात आली. त्याचे पत्र पोलिसांची लबाडी उघड करते आहे. त्यामुळे ठेकेदाराला वाचवण्यासाठी पोलिसांनी सागर गोतपागर यांच्याविरुद्ध खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे उघड झाले आहे.

Updated : 21 Aug 2020 3:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top