Home > News Update > CAA : मुजफ्फरनगर मध्ये पोलिसांनी लोकांना घरात घुसून मारलं, CCTV फुटेज मध्ये पोलिसांचे कारनामे कैद

CAA : मुजफ्फरनगर मध्ये पोलिसांनी लोकांना घरात घुसून मारलं, CCTV फुटेज मध्ये पोलिसांचे कारनामे कैद

CAA : मुजफ्फरनगर मध्ये पोलिसांनी लोकांना घरात घुसून मारलं, CCTV फुटेज मध्ये पोलिसांचे कारनामे कैद
X

सध्या नरेंद्र मोदी सरकारने मंजूर केलेल्या CAA नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. उत्तर प्रदेश आत्ता पर्यंत 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुज़फ़्फरनगर येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन या कायद्याचा विरोध केला. पोलिसांच्या मते प्रदर्शन करणाऱ्या (आंदोलकांनी) तोडफोड आणि गोळ्या चालवल्या. मात्र, प्रत्यक्षात काही उलट स्थिती समोर येत आहे.

एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीने दिलेल्या एका रिपोर्टमध्ये पोलिसांनीच तोडफोड केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. विशेष म्हणजे पोलिस तोडफोड करत असल्याचे फुटेज समोर येऊ नये म्हणून पोलिसांनीच या ठिकाणचे सीसीटीव्ही तोडल्याचं कॅमेरात दिसून येत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे पोलिस इथंच थांबले नाही. तर पोलिसांनी घरात घुसून लोकांच्या सामानाची तोडफोड केली आहे. तसंच काही नागरिकांना देखील पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून मारलं असल्याचं इथले नागरिक सांगत आहे.

हे ही वाचा...

लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या, करोडो तरुणांची बेरोजगारी ही कशाची लक्षणं आहेत?

बाबासाहेबांनी मनुस्मृती ३ वेळा का जाळली?- प्रा. हरी नरके

झारखंडचा इशारा!

यावर मुज़फ़्फ़रनगर चे पोलिस अधिक्षक सतपाल अंटिल यांनी पोलिसांनी अशा प्रकारे कुठलीही तोडफोड केली नसल्याचं म्हटलं आहे. आमची फोर्स शिस्तबद्ध आहे. आम्ही असं काही केलेलं नाही. असं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

मात्र, परिस्थिती वेगळंच सांगत आहे. घरामध्ये RAF पोलिसांची टोपी आणि काठ्या मिळाल्या आहेत.

याच काठ्यांनी अनेक नागरिकांची डोके पोलिसांनी फोडली असल्याचं इथले नागरिक सांगत आहेत.एका सीसीटीव्ही मध्य़े मुज़फ़्फरनगर च्या खालापार भागात पोलिस एका मस्ज़िदची ख़िड़की तोडताना दिसत आहेत. त्यानंतर हे पोलिस शोधून शोधून एक सीसीटीव्ही तोडताना दिसतात. एका सीसीटीव्ही मध्ये एक पोलिस वाला त्याच्या हातातील काठीनं दुकानात ठेवलेलं सर्व सामान तोडताना दिसत आहे.

या सर्व घडामोडी पाहिल्यानंतर एक बाब प्रकर्षाने समोर येत आहे. ती म्हणजे खरंच पोलिसांनी ही तोडफोड केली का? सीसीटीव्ही फुटेज पाहता प्रथमदर्शनी तर पोलिस हे करताना दिसत आहेत. त्यामुळे ‘रक्षक असणारे पोलिस भक्षक’ का झाले? त्यांना कोणी असे आदेश दिले का? आणि जनता ज्यांच्या रक्षणामुळे आपण सुरक्षित आहोत. असं मानते त्यांनी जर असं केलं तर जनता कोणाकडे जाणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

Updated : 25 Dec 2019 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top