झालेली चूक सुधारुन अजित पवारांनी परत यावे – अशोक चव्हाण

अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. सत्ता स्थापने संदर्भात घडलेल्या या घटनांनंतर अनेक राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली

हे ही वाचा
कुठे बिघडलं गणित?
2014 ला भाजपाला पाठींबा देणं ही ऐतिहासिक चूक होती – जितेंद्र आव्हाड
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद

सत्ता स्थापनेसाठी बहुमत असल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची फसवणूक केली आहे. राष्ट्रवादीचे जे पत्र राज्यपालांना देण्यात आले, त्यातील ४८ आमदार राष्ट्रवादीच्या संध्याकाळच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि अजित पवारांनीही झालेली चूक स्वीकारून परत यावे व राजीनामा द्यावा. असं मत व्यक्त केलं आहे.