Home > News Update > ईव्हीएमवर विश्वास नसल्याने कॉंग्रेसच्या माजी आमदाराची निवडणूकीतून माघार

ईव्हीएमवर विश्वास नसल्याने कॉंग्रेसच्या माजी आमदाराची निवडणूकीतून माघार

ईव्हीएमवर विश्वास नसल्याने कॉंग्रेसच्या माजी आमदाराची निवडणूकीतून माघार
X

बुलडाण्याच्या खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. खामगाव मतदार संघातून 15 वर्षे आमदार राहिलेले काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा यांनी ऐनवेळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. विशेष म्हणजे याबाबत त्यांनी रात्री उशिरा प्रसिद्धी पत्रकही काढले असून त्यामध्ये निवडणूक न लढविण्याबाबतची कारणे नमूद केली आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची खामगाव मतदार संघात पीछेहाट झाल्यावर दिलीपकुमार सानंदा हे बॅकफूटवर आले होते. ते निवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याची चर्चा होती. गेल्या आठवडाभर सानंदा यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली. त्यांनी खामगावात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला; मात्र तेच मेळाव्याला हजर राहिले नसल्याने सानंदा लढणार नाहीत असे चित्र तयार झाले होते. दरम्यान आता त्यांनी मौन सोडलं आहे. त्यांनी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली असून निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात यांना लेखी पत्र देऊन महिन्यांपूर्वीच निवडणूक न लढण्याची कल्पना दिल्याचे या पत्रकात नमूद आहे. ईव्हीएमवर संशय व्यक्त करीत निवडणूक लढत नसल्याचे दिलीपकुमार सानंदा यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचा हा निर्णय कार्यकर्ते व चाहत्यांना धक्का देणारा आहे.

Updated : 1 Oct 2019 12:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top