Home > News Update > घ्या! डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला गेट कोसळला…

घ्या! डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला गेट कोसळला…

घ्या! डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला गेट कोसळला…
X

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भारत सरकार कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. ट्रम्प यांना जेवनासाठी सोन्याचा मुलामा असलेली भांडी तयार करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. तर कुठं ट्रम्प यांना भारतातील गरीबी दिसू नये म्हणून भींती बांधल्या जात आहेत.

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम समजल्या जाणाऱ्या मोटेरा स्टेडियममध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असताना मोटेरा स्टेडियममधील गेट कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नसली तरी ट्रम्प आणि मोदी याच गेटमधून प्रवेश करणार होते.

Updated : 23 Feb 2020 11:32 AM GMT
Next Story
Share it
Top