Home > News Update > समृद्धी महामार्गाची चौकशी होणार

समृद्धी महामार्गाची चौकशी होणार

समृद्धी महामार्गाची चौकशी होणार
X

समृद्धी महामार्गाच्या सर्व फाइलींचा रिव्ह्यू घ्यायचं काम सध्या सुरू असून या कामामध्ये मोठा गैरव्यवहार झल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याने या प्रकल्पाची लवकरच चौकशी घोषित केली जाणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामाचा स्कोप वारंवार बदलण्यात आला असून त्यासाठी फेरनिविदा करण्याएवजी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या होत्या. या प्रकल्पाच्या सुरूवातीला केवळ नाशिक पर्यंतच सिमेंट रोड होणार होता. मात्र, त्यानंतर संपूर्ण रोड सिमेंटचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच प्रमाणे जमिनीचा मोबदला देण्यामध्येही गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आहेत.

हे ही वाचा

पी चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल ‘हेच का अच्छे दिन’

‘डग बीगन’ झाला ‘वर्षा’

चैत्य भूमीवरील अभिवादनावरून भाजपने उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडलं

या संपूर्ण प्रकल्पाची चौकशी लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाशी संबंधित सर्व फाइली मंत्रालयातून मागवण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प थांबवून त्याच होऊ घातलेला अनावश्यक खर्च शेतकरी कर्जमाफी साठी वळवण्यात यावा असा सरकार दरबारी सूर आहे.

अधिकारी - नेते नातेसंबंधांचीही चौकशी होणार

समृद्धी महामार्गाच्या निविदा प्रकरणी काही बड्या अधिकाऱ्यांची तसंच राजकीय नेत्यांच्या नातेसंबंधांचीही चौकशी होणार आहे.

Updated : 5 Dec 2019 7:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top