Home > News Update > आँटोरिक्षा चालकांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक

आँटोरिक्षा चालकांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक

आँटोरिक्षा चालकांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक
X

ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृती समिती द्वारे नियोजित संप मागे घेतल्याने तूर्तास तरी जनतेची गैरसोय टळली असल्याचे दिसून येत आहे. भाडेवाढ आणि ओला, उबेरच्या वाहतुकीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील रिक्षाचालकांनी पुकारलेला नियोजित संप अखेर मागे घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्र्यांनी भेटीचे आश्वासन दिल्यामुळे आपण हा संप मागे घेत असल्याची घोषणा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली. या भेटीत आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आम्हाला आहे. त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही संप मागे घेत आहोत असे शशांक राव म्हणाले.

सोमवारी दुपारी परिवहन सचिव आणि रिक्षा चालक संघटनेचे नेते शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालक संघटनांचे शिष्टमंडळ यांची बैठक झाली होती परंतु या बैठकीतून काहीच तोडगा न निघाल्याने रिक्षा चालक-मालक संपावर ठाम होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर हा संप मागे घेतला आहे.

Updated : 9 July 2019 4:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top