Home > Election 2020 > मावळमध्ये निवडणूक अधिकारीच म्हणाला धनुष्यबाणाला मतदान करा, मतदाराची आयोगाकडे तक्रार

मावळमध्ये निवडणूक अधिकारीच म्हणाला धनुष्यबाणाला मतदान करा, मतदाराची आयोगाकडे तक्रार

मावळमध्ये निवडणूक अधिकारीच म्हणाला धनुष्यबाणाला मतदान करा, मतदाराची आयोगाकडे तक्रार
X

मतदानाच्या काळात ज्या निवडणूक कर्मचारी-अधिकारी यांच्यावर आचारसंहिता भंग न होऊ देण्याची जबाबदारी असते तेच अधिकारी मतदान केंद्रात उमेदवाराचा प्रचार करत असल्याची तक्रार हुमेरा पठाण यांनी केलीय.

मावळ (Maval) लोकसभा (Loksabha) मतदारसंघातील चिंचवड इथल्या क्वीन्सटाऊन इथल्या रहिवाशी असलेल्या हुमेरा पठाण या जयवंत भोईर प्राथमिक शाळा भोईरनगर इथं मतदान करण्यासाठी गेल्या होत्या. शाळेच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक. २ मध्ये बुथ क्र. ३३ इथं त्यांचं मतदान होतं. त्यावेळी या बुथवरील मतदान अधिकारी निकाळजे हे मतदानासाठी आलेल्या मतदारांना धनुष्यबाणाला मतदान करण्यास सांगत होते. हा थेट आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार हुमेरा पठाण यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केलीय.

Updated : 29 April 2019 12:22 PM GMT
Next Story
Share it
Top