Home > News Update > पंकजा मुंडे आणि खडसेंच्या भेटीत नक्की काय झालं?

पंकजा मुंडे आणि खडसेंच्या भेटीत नक्की काय झालं?

पंकजा मुंडे आणि खडसेंच्या भेटीत नक्की काय झालं?
X

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या राजकीय भवितव्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून या पोस्टमध्ये आपण 12 डिसेंबरला आपली पुढील वाटचाल ठरवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर पंकजा मुंडे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला उधान आलं आहे.

पंकजा मुंडे नाराज असल्याचं कळताच भाजपमधील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या बहुतांश नेत्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्या भेटीनंतर नुकतीच एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. आणि या भेटीत नक्की पंकजा मुंडे काय बोलल्या या बाबत माध्यमांशी संवाद साधला.

"चर्चेअंती माझं आणि पंकजाचं एकमत आहे की, काही प्रमाणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परळी आणि मुक्ताईनगर जागा पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला, बहुजन समाज आणि ओबीसींचं नेतृत्व करणारे नेते दुर्दैवानं हारले, काहींना तिकीटं नाकारली. निट रचना झाली असती तर 105 पेक्षा जास्त आमदार आले असते."

असं म्हणत राज्याचे नेतृत्व सांभाळणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Updated : 5 Dec 2019 4:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top