Home > News Update > गिरिश महाजन यांचं आव्हान स्वीकारलं - एकनाथ खडसे

गिरिश महाजन यांचं आव्हान स्वीकारलं - एकनाथ खडसे

गिरिश महाजन यांचं आव्हान स्वीकारलं - एकनाथ खडसे
X

पराभवाला कारणीभूत असलेल्यांची नाव आणि पुरावा देण्याची माझी तयारी असल्याचं सांगत एकनाथ खडसे(Eknath khadse) यांनी प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी परवानगी दिली तर नावासह पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन नाव जाहीर करेन असं सांगत भाजपला कोंडीत पकडलंय.

पंकजा मुंडे, रोहिणी खडसेंसह काही मतदार संघात भाजपच्याच उमेदवारांना काही नेत्यांनी पाडापाडी केल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. त्या नेत्यांची नावं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले आहेत. त्यावर काल पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन(Girish mahajan) यांनी खडसेंना खुलं आव्हान केलं होतं की नावं जाहीर करा, यावर खडसेंनी महाजनांवर पलटवार केला असून यावेळी खडसेंनी महाजन यांनाच नाही तर भाजपलाच अडचणीत आणलं आहे.

Updated : 7 Dec 2019 12:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top