Home > Election 2020 > VIDEO : शरद पवारांवर गुन्हा दाखल, नक्की काय शिखर बॅंक घोटाळा पाहा

VIDEO : शरद पवारांवर गुन्हा दाखल, नक्की काय शिखर बॅंक घोटाळा पाहा

VIDEO :  शरद पवारांवर गुन्हा दाखल, नक्की काय शिखर बॅंक घोटाळा पाहा
X

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी (MAHARASHTRA STATE CO BANK SCAM) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ED case) यांच्याविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.

शिखर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्यातील जिल्हा बँकांची शिखर बँक समजली जाते. या शिखर बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. 195 कोटीं रुपयांचे दिलेले कर्ज असुरक्षित आहे. नक्की हा घोटाळा काय आहे? या प्रकरणाची विस्तारित माहिती जाणुन घेण्यासाठी पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचा व्हिडीओ..

https://youtu.be/5g4AbT4XsWA

Updated : 24 Sep 2019 5:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top