MSME क्षेत्राला 3 लाख कोटी, नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया

Courtesy: Social Media

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज च्या संदर्भात माहिती दिली. कोरोना व्हायरस च्य़ा संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत करताना मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. त्या पॅकेज अंतर्गत MSME सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपये पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्रीय सूक्ष्म-लघु-मध्यम मंत्री नितीन गडकरी यांनी या पॅकेजची स्तुती केली आहे.

‘आत्मनिर्भर भारत’ करण्यासाठी सरकारने हे ऐतिहासीक पाऊल उचललं आहे. MSME हा देशाच्या आर्थिक कणा आहे. त्याची सरकारने आज ताकद वाढवली आहे.