भाजीपाल्याच्या गाड्यांना मिळणार आता विशेष परिवहन प्रमाणपत्र

26

भाजीपाला, औषधी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी आता विशेष वाहन प्रमाणपत्र मिळणार आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर केवळ जीवनावश्यक सेवा पुरावणाऱ्यांना बाहेर फिरण्याची मुभा आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्यांना अनेक ठिकाणी पोलीस यंत्रणेच्या अडवणुकीला सामोरं जावं लागतंय. यावर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आली आहे. यापुढे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्यांना विशेष परिवहन प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.

चालकाने हे प्रमाणपत्र प्रवासादरम्यान सोबत बाळगायचं आहे. हे प्रमाणपत्र दाखवल्यानंतर अशा गाड्यांना कुठेही अडचण येणार नाही. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या भाजीपाल्याच्या सर्व गाड्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

पहा व्हिडीओ,

 

Comments