Home > News Update > निवडणूक कामात कुचराई, ७१ बीएलओंवर गुन्हे दाखल

निवडणूक कामात कुचराई, ७१ बीएलओंवर गुन्हे दाखल

निवडणूक कामात कुचराई, ७१ बीएलओंवर गुन्हे दाखल
X

मतदार यादी पडताळणी मोहिमेच्या कामात हलगर्जी करणाऱ्या बुलडाणा जिल्हातल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात ७१ बीएलओंवर कारवाई करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांविरुध्द पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल कऱण्यात आलेत. आतापर्यंत राज्यातील ही मोठी कारवाई मानली जाते.

मतदार पडताळणी मोहीमेअंतर्गत राज्यात सर्वत्र मतदारयाद्यांची पुनर्निरीक्षण करण्याचं काम सुरु आहे. बुलडाणा जिल्ह्यात ११ नोव्हेंबर ते १३ फेब्रुवारी या दरम्यान मतदार यादी पुर्ननिरीक्षणाचं काम पुर्ण करायचं होत. यासाठी बीएलओ अँप विकसित करण्यात आलंय. मेहकर तालुक्यातल्या २ लाख १७ हजार ८८ एवढी मतदार यादी अद्यावत करायची होती. या कामाकरीता २४१ बीएलओंची नेमणूक करण्यात आली. मात्र तीन महिने झाले तरी या कामात काही प्रगती झाली नाही. केवळ ७ टक्के काम होवू शकलं.

काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वांरवार समज दिली गेली. काही शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. मात्र त्याचाही काही परिणाम झाला नाही. अखेरीस ७१ बीएलओंवर मेहकर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याचा आदेश नायब पंकज मगर यांनी दिले. त्यानूसार मेहकर पोलिस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधीत्व कायद्याअंतर्गत या बीएलओंवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.

यापुर्वी विधानसभा मतदानादरम्यान मेहकर तालुक्यातील ग्राम डोणगांव इथं १२० क्रमांकाच्या बूथ क्रमांकावर पुन्हा मतदान घेण्याची वेळ आली होती. या बूथवरील सर्व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Updated : 6 Feb 2020 1:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top