सरकार विद्यार्थ्यांची किडनी विकत घेणार का?

36

कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन उठवून अनलॉकचे टप्पे सरकारने सुरू केले आहेत. पण या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेलाय, काहींच्या नोकऱ्या गेल्या आहत, काहींचे पगार थकलेत, तर शेतकरी हवालदिल झालाय. पण असे असले तरी ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळा आणि कॉलेजेमध्ये मात्र फी वसुली केली जाते आहे. या कठीण प्रसंगात फी भरायची कशी या विवंचनेत अनेक पालक आहेत. यावर आता विद्यार्थ्यांनीही आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्र्यांनाच एक ऑफर दिली आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या प्रसाद देशमुख या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आपल्याकडे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने मुख्यमंत्र्यांनी माझी किडनी गहाण ठेवावी किंवा विकत घ्यावी असे आवाहन त्याने केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांना रूमचे भाडे, हॉस्टेलची फी भरणे शक्य नसल्याने यासर्व विद्यार्थ्यांच्या किडन्या विकत घ्या पण पैस द्या असे या विद्यार्थ्याने म्हटले आहे. शाळांच्या फी वसुलीला चाप लावण्यासाठी सरकार काहीही करत नसल्याने अखरे विद्यार्थ्यांनी आता आपल्या संतापाला अशी वाट करुन दिली आहे.

Comments