Home > News Update > कोरोनाशी लढा- यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव साधेपणाने

कोरोनाशी लढा- यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव साधेपणाने

कोरोनाशी लढा- यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव साधेपणाने
X

कोरोनाच्या संकटामुळे पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजानिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरूवारी झालेल्या मानाच्या गणपती मंडळाच्या व्हिडिओ काॅन्फसरींगमध्ये घेण्यात आला.

यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. सर्व तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेचीही खबरदारी घेण्यात येणार आहे. रोजच्या धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त ह इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि लोकांचे हित लक्षात ठेऊन घेण्यात येणार आहे. प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरूपा संदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे असेही या बैठकीत ठरले.

आवाहन

या बैठकीत सर्व मंडळांनी नागरिकांना, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहनही केले की आगामी गणेशोत्सवात कोणीही आपल्या श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरून पावित्र्य भंग होईल.

या बैठकीला कसबा गणपती,तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरूजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ, भाऊ रंगारी,अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

Updated : 21 May 2020 12:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top