Home > News Update > संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे 9 वे कुलगुरू म्हणून डॉ.दिलीप मालखेड यांनी स्वीकारला पदभार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे 9 वे कुलगुरू म्हणून डॉ.दिलीप मालखेड यांनी स्वीकारला पदभार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे 9 वे कुलगुरू म्हणून डॉ.दिलीप मालखेड यांनी स्वीकारला पदभार
X

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे 9 वे कुलगुरू म्हणून डॉक्टर दिलीप मालखेड यांनी पदभार नुकताच स्वीकारला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर जॉब मिळण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करणे फार महत्त्वाचे आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले, त्यासाठी विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी बी ए, एम कॉम, बीएससी पदवीत्तर पदवी यामध्ये थोडे विषय बदलविणे गरजेचे आहे , जेणेकरून विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी मदत होईल असं ते म्हणाले.

दरम्यान वेगवेगळे अभ्यासक्रमासोबतच काही शॉर्ट कोर्स सुरू करण्याची गरज असल्याची भावना देखील नवनिर्वाचित कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे यांनी आपले पद ग्रहण करताना व्यक्त केली. डॉ. दिलीप मालखेड हे मूळचे अमरावतीचे असल्याने विद्यापीठामध्ये आता काहीतरी नाविन्यपूर्ण बदल होईल अशी आशा लागली आहे.

Updated : 17 Sep 2021 6:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top