Home > News Update > ‘ईडी’ची माघार; आज येऊ नका, ‘ईडी’चं पवारांना पत्र

‘ईडी’ची माघार; आज येऊ नका, ‘ईडी’चं पवारांना पत्र

‘ईडी’ची माघार; आज येऊ नका, ‘ईडी’चं पवारांना पत्र
X

शिखर बँकेतल्या कथित गैरव्यहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ‘ईडी’ कार्यालयात चौकशीसाठी हजर रहाणार होते. मात्र, आता ईडीनं याप्रकरणी नमती भूमिका घेत आज चौकशीसाठी येण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. ईडीनं या विषयासंदर्भात ( Sharad Pawar ) शरद पवार यांना ई-मेलद्वारे पत्र लिहीलं आहे. सध्या याप्रकरणी स्वतःहून चौकशी साठी येण्याची गरज नाही आणि भविष्यात गरज पडेल तेव्हा बोलवलं जाईल असं म्हटलं आहे.

यानंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या ( NCP ) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. सकाळपासून या परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. राज्यभरातून कार्यकर्ते या परिसरात दाखल झाले आहेत. त्यांनी घोषणाबाजी करत हा परिसरा दणाणून सोडला आहे.

पत्र आल्यानंतरही शरद पवार ईडी कार्यालयात जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेणार होते, मात्र मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे ( sanjay Barve ) यांच्या विनंतीनंतर पवारांनी ED कार्यालयाला जाण्याचा बेत तहकूब केला.

Updated : 27 Sep 2019 8:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top