Home > News Update > डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा आजपासून सुरू; साडेअकरा वाजता अहमदाबादेत पोहोचणार

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा आजपासून सुरू; साडेअकरा वाजता अहमदाबादेत पोहोचणार

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा आजपासून सुरू; साडेअकरा वाजता अहमदाबादेत पोहोचणार
X

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आजपासून २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन काल रात्री ट्रम्प सहकुटुंब रवाना झाले आहेत. ते सकाळी साडेअकरा वाजता अहमदाबादला पोहोचतील. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर उपस्थित असणार आहेत.

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. अहमदाबादेतल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियममधील 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात ट्रम्प आणि मोदी जनसभेला संयुक्तरित्या संबोधित करणार आहेत.

त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते २२ किलोमीटरचा रोड शो करतील. यासोबत डोनाल्ड ट्रम्प साबरमती आश्रमलाही भेट देणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोड शोच्या मार्गावर २८ मंच उभारण्यात आले आहेत. त्या मंचांवर देशातील २८ राज्यांच्या विविधतेचं दर्शन घडणार आहे.

Updated : 24 Feb 2020 3:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top