Home > News Update > अमेरिकेत नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का, ट्रम्प यांचा मोठा निर्णय

अमेरिकेत नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का, ट्रम्प यांचा मोठा निर्णय

अमेरिकेत नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का, ट्रम्प यांचा मोठा निर्णय
X

अमेरिकेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न जगभरातले तरुण पाहत असतात. पण आता कोरोनामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी देखील वाढलेली आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1 B व्हिसासह सर्व एम्प्लॉयमेंट व्हिसा़वर या वर्षाच्या अखेरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

अमेरिकेत लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. त्यामुळे नोकरीच्या नवीन संधी स्थानिकांना मिळाल्या पाहिजे या धोरणानुसार ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे. याआधी एप्रिलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीन कार्डवर स्थगिती आणली होती. या ग्रीन कार्डवरील स्थगिती देखील आता पुढे वाढवण्यात आलेली आहे.

हे ही वाचा..

गरीबांसाठी सोनिया गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती…

कलेक्टर, एसपी जेव्हा प्रतिबंधित क्षेत्रात ‘ऑनफिल्ड’ उतरतात

अजित दादा म्हणतात… ‘घरात रहा, खेळत रहा, तंदुरुस्त रहा!’

दरम्यान अमेरिकन काँग्रेसचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध केला आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. या व्हिसांमुळे अमेरिकेला आरोग्य क्षेत्रांमधील मनुष्यबळाची कमतरता भरून काढता येते. त्याचबरोबर अमेरिकेतल्या अर्थक्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी जगभरातील तज्ज्ञ लोकदेखील अमेरिकेला उपलब्ध होतात, असं राजा कृष्णमूर्ती यांनी म्हटलेले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेसह अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो असा इशारा देखील कृष्णमूर्ती यांनी दिलेला आहे.

दरम्यान अमेरिकेमध्ये सध्या जे परदेशी तरुण वर्क व्हिसावर काम करत आहेत त्यांना या निर्णयामुळे कोणताही फटका बसणार नाही असे देखील प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

Updated : 23 Jun 2020 2:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top