Home > News Update > CAA – ट्रम्प यांनी भारताकडून व्यक्त केली अपेक्षा

CAA – ट्रम्प यांनी भारताकडून व्यक्त केली अपेक्षा

CAA – ट्रम्प यांनी भारताकडून व्यक्त केली अपेक्षा
X

दोन दिवसांच्या दौऱ्यात सीएएबाबत मोदींशी चर्चा झाली नाही पण भारत सरकार आपल्या नागरिकांच्या दृष्टीने योग्य तो निर्णय़ घेईल, अशी आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. दोन दिवसांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ट्रम्प यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सीएएबद्दल आम्ही चर्चा केली नाही.

पण धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य असायलाच हवं आणि त्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत असं पंतप्रधान मोदींनी सांगितल्याचं ट्रम्प म्हणाले. दिल्लीतल्या हिंसाचाराबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी या हल्ल्यांबद्दल आपण ऐकलं आहे पण मोदींना त्याबाबत विचारणा केली नाही असं सांगितलं. तसंच हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून सरकार तो हाताळेल अशी प्रतिक्रिया दिली.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि अमेरिके दरम्यान लष्करी हेलिकॉप्टर खरेदीचा ३ अब्ज डॉलरचा करार झाला. तसंच व्यापार करार, तंत्रज्ञान, ५ जी, यासारख्या मुद्द्यांवरही सकारात्मक चर्चा झाल्याचं ट्रम्प आणि मोदी यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. तर दहशतवादाच्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिका हे एकत्रित काम करणार असल्याचंही मोदींनी सांगितले.

Updated : 25 Feb 2020 1:44 PM GMT
Next Story
Share it
Top