पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातलं धक्कादायक चित्र

422

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्या मतदारसंघात महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरच नसल्य़ाचं धक्कादायक चित्र समोर आले आहे. वरळी मधील बी.बी.डी. चाळ या भागात महानगरपालिकेचा दवाखाना आहे. या दवाखान्यात प्रत्येक दिवसाला 100 ते 150 रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु गेल्या 24 महिन्यांपासून महानगर पालिकेचा या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नाहीत त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातलं धक्कादायक चित्र

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्या मतदारसंघात महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरच नसल्य़ाचं धक्कादायक चित्र समोर आले आहे. आरोग्याच्या बाबतीत नागरिकांची वानवा होतेय… पाहा व्हिडीओ

Posted by Max Maharashtra on Monday, February 10, 2020

स्थानिक नागरिक आणि मनसे शाखाध्यक्ष मंगेश कशालकर यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करुन या भागात वैद्यकीय अधिकारी नेमावेत अशी मागणी केली आहे. पण येथील रुग्णांकडे पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार इथल्या स्थानिक नागरिकांनी केली आहे. महानगर पालिकेच्या स्थायी समितीसमोर अनेकवेळा हा मुद्दा मांडण्यात आला आहे. सुधार समितीमध्येही 24 तासांच्या आत डॉक्टर नेमावेत असंही सांगण्यात आलं. पण अजूनही आरोग्य विभाकडून वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आलेले नाहीत, पर्यावऱण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील ही धक्कदायक स्थिती आहे.

याच वरळी भागातील नगरसेवक अरविंद भोसले हे देखील शिवसेनेचेच आहे. पण त्यांनी या मुद्यावर बोलण्यास नकार दिला. तर आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी तर डॉक्टर नाहीत हे मान्य न करत तिथे डॉक्टर नियमितपणे येत असल्याचा दावा केलाय. त्यामुळे या भागातील स्थानिक नागरिक खोटं बोलतायत का असा प्रश्न उभा राहिला आहे. आदित्य ठाकरेंचे स्वप्न असलेला नाईट लाईफचा निर्णय सरकारनं तातडीनं घेतला. पण सामान्यांच्या जीवना-मरणाचा प्रश्न असलेल्या या दवाखान्याकडे दुर्लक्ष का असा सवाल इथेल नागरिक करत आहे. आम्हा नाईट लाईफ नको लाईफ हवी अशी मागणीही इथले नागरिक करत आहेत.

यासंदर्भात आम्ही विरोधी पक्षनेते रवी राजा यांना विचारणा केली असता महानगर पालिकेच्या स्थायी समितीत वारंवार हा मुद्दा मांडलेला असल्याने बजेटमध्ये याची तरतूद करुन डॉक्टर नेमावत अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितले. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना याबाबत विचारले असता, आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात असं काय नसले असं सांगून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.