धक्कादायक! मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू

27

मुंबईत एका डॉक्टरचा कोरोना (corona) ने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईत देशातील सर्वाधिक कोरोनाचे (coronavirus) रुग्ण आहेत. मृत डॉक्टर हे मुंबईतील गिरगाव चे असून ते दळवी रुग्णालयाचे सेक्रेटरी होते. होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या शशांक मूळगावकर  (Shashank Mulgaokar) यांचा काल बॉम्बे हॉस्पिटल (Bombay Hospital) मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते 56 वर्षाचे होते.

हे ही वाचा…


संघर्ष दिन: अखेर निर्णय झाला..! पंकजा मुंडे गोपिनाथ गडावर जाणार का?

चीन चक्रव्युव्हात अडकला!

नरेंद्र मोदी : के भैया सब कुछ ऑल इज वेल है क्या? हेमंत देसाई

कोकण किनारपट्टीवर २ दिवसात वादळाचा इशारा

डॉक्टर मूळगावकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर 18 मे रोजी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना 24 मे रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, शेवटी काल त्यांचा मृत्यू झाला.

मूळगावकर हे अनेक बड्या सेलिब्रिटींचेही डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. होमिओपॅथिमध्ये शिरस्ता असलेले डॉ. मूळगावकर हे बॉलिवूडच्या कपूर कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर होते.

Comments