Home > News Update > चांगलं झालं तर संघाने केलं आणि वाईट केलं तर नेहरुजींनी केलं

चांगलं झालं तर संघाने केलं आणि वाईट केलं तर नेहरुजींनी केलं

चांगलं झालं तर संघाने केलं आणि वाईट केलं तर नेहरुजींनी केलं
X

मुंबईत कोरोनाला रोखताना आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी मधील कोरोना कसा रोखणार? असं आव्हान सरकार समोर होतं. आज मुंबईतील धारावीत कोरोनाला रोखण्यासाठी जे काही प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी ‘धारावी मॉडेल’ची स्तुती केली आहे.

सुरुवातीला धारावी मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर धारावी मधील कोरोना कसा आटोक्यात आणायचा असा प्रश्न सरकार समोर होता. मात्र, या परिस्थितीत धारावीमधील कोरोना आटोक्यात आणल्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने या मॉडेलची स्तुती केली आहे.

“मुंबईतील धारावी परिसरात कोरोना चाचणी, रुग्णांचा शोध घेणं, सोशल डिस्टन्सिंग आणि संसर्ग झालेल्या रुग्णांवर त्वरित उपचार केल्यामुळे करोनाविरोधातील लढाईत यश मिळताना दिसत आहे. काही देशांमध्ये आता निर्बंध कमी करण्यात येत आहेत. अशा ठिकाणी पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता आवश्यक आहे. एडहानोम गेब्रेयेसुस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान आरोग्य संघटनेच्या या ट्विट नंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये धारावीसारख्या परिसराला करोनामुक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर समाजसेवी संस्था रात्रंदिवस कुठलाही गाजावाजा न करता काम करत होत्या. आता धारावी करोनामुक्त होण्याकडे वाटचाल करत असताना त्याचे संपूर्ण श्रेय राज्य सरकारला देणे हा संघासारख्या समाजसेवी संस्थांवर अन्याय आहे.

असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

या संदर्भात कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नितेश राणे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं स्तुती केल्यानंतर संघ तिथं उतरला. मग आत्तापर्यंत कोरोना तिथे जो काही कोरोना वाढत होता. त्याला संघ जबाबदार होता का? मोदी साहेबांनी अचानकपणे लॉकडाऊन जाहीर केला. लोकांना परिस्थिती समजावून सांगितलं नाही. लोकांना आपल्या घरी जाण्यास संधी दिली नाही. त्यानंतर लोक घराबाहेर पडले. त्यामुळं कोरोनाचा प्रसार वाढला. त्यासाठी मोदी जबाबदार नाहीत का?

चांगलं झालं, संघाने केलं, आम्ही केलं. आणि परिस्थिती थोडीशी गंभीर झाली तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागले. तर लगेच नेहरुजी जबाबदार. लगेच महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सपशेल फेल झाले. अशा पद्धतीची टीका यावेळेला शोभत नाहीत.

असं म्हणत या संकट समयी सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाचा सामना करायला हवा. असं अतुल लोंढे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

Updated : 11 July 2020 1:49 PM GMT
Next Story
Share it
Top