Home > News Update > विविध मागण्यांसाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते धडकले विधानभवनावर

विविध मागण्यांसाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते धडकले विधानभवनावर

विविध मागण्यांसाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते धडकले विधानभवनावर
X

पुरंदर येथील धनगर समाजाच्या अत्याचार झालेल्या मुलीला न्याय दयावा, या प्रमुख मागणी सह अर्थसंकल्पातील गाजर नको, धनगर समाजाच्या हक्काच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागण्यांसाठी 'महाराष्ट्र यशवंत सेने'च्या कार्यकर्त्यांनी आज विधानभवनाच्या गेटवर 'धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन' देणाऱ्या फडणवीस सरकारचा निषेध केला.

[gallery td_select_gallery_slide="slide" ids="44027,44028,44029,44030,44031,44024"]

यावेळी विधानभवनात घुसणाऱ्या मुंबई प्रमुख धनाजी धायगुडे, आदिनाथ पाटील, बाळासाहेब खांडेकर, राजेश कोळेकर, अमर इंगळे, मोहन महारनुर, दिनेश सोलनकर, आकाश गुरचळ, प्रकाश गुरचळ, दीपक नरुटे, समाधान इरकर, कृष्णा गडदे, शिवाजी ठोंबरे, आकाश खोत या महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुरंदर घटनेतील आरोपींकडे प्रशासन आणि राज्य सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे, असा आरोप देखील यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Updated : 20 Jun 2019 4:27 PM GMT
Next Story
Share it
Top