Home > Election 2020 > ‘जनतेच्या मनात मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न’- धनंजय मुंडे

‘जनतेच्या मनात मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न’- धनंजय मुंडे

‘जनतेच्या मनात मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न’- धनंजय मुंडे
X

भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपने शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला आहे. या व्हायरल व्हिडीओ संदर्भात धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत संबधित व्हिडीओ एडीट केला असल्याचं म्हटलं आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा

धनंजय मुंडे यांनी विडा येथे झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विरुद्ध बोलताना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ आणि बिभत्स भाषेत टीका केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केला आहे. या फिर्यादीवरून धनंजय मुंडें विरूद्ध कलम ५००,५०९,२९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

https://youtu.be/AbXkyWD8fTU

याप्रकरणी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संबधित व्हिडाओ हा एडीट करुन अयोग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवुन जनतेच्या मनात मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे.

“व्हिडीओ एडीट करणाऱ्यांनी किमान बहीण भावाच्या नात्यात असं विष कालवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे फारच खालच्या पातळीचं राजकारणं केलं जात आहे.” अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

“विचारांच्या मुद्द्यात मला हरवता येत नाही म्हणुन भावनांचं राजकारण करुन मला संपवण्याचा कट केला जातोय. भाजप ही निवडणूक ( Maharashtra Election 2019) विकासाच्या मुद्द्यांवर न लढवता भावनांच्या मुद्द्यांवर लढवत आहे. मोदी, शाह आणि उदयनराजेंना आणुनही काही होत नाही म्हणुन आता बहीण भावाच्या नात्याला बदनाम का करावं?” असा सवाल मुंडे यांनी पत्रकार परिषदेत विचारला आहे.

Updated : 20 Oct 2019 8:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top